लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वैतागली, अभिनेत्रीनं डिलीट केले लग्नाचे सगळे फोटो, म्हणाली...

हा प्रकार पाहून आता तिचे चाहत्यांना चिंता लागली आहे. रेनीनं लग्नाची पोस्ट एका दिवसात का डिलीट केली, काही समस्या तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मात्र, खुद्द रेनेनं याचं उत्तर दिलं आहे. रेनेनं एक स्टोरी शेअर करत लिहिले, 'गैरसोयीबद्दल माफी. असो, सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.'

'पण मी योग्य वेळी योग्य पद्धतीने अपडेट करेन. इन्स्टाग्रामवरील मित्रांनो, तुम्ही पण थांबा. मला खूप कॉल आणि मेसेज येत आहेत ज्यामुळे मी चिंताग्रस्त झाले आहे. '

लग्नाच्या दिवशी पोस्ट पाहून आलेल्या कॉल्स आणि मेसेजेसमुळे रेनी खूप कंटाळली. ज्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करता आलं नाही म्हणून तिनं पोस्ट काढून टाकल्या.

रेनीनं तिच्या पतीसोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले आणि लिहिले की, जेव्हा अरेंज्ड मॅरेज हे लव्ह मॅरेजमध्ये बदलतं.

रेनीनं 5 जुलै रोजी दिल्लीच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर सत्या वर्माशी लग्न केलं. अभिनेत्री स्वतः नोएडाची रहिवासी आहे.

रेनी 'बिग बॉस 8' आणि रोडीजचा भाग होती. तिने 'ये तेरी गलियान', 'कसम तेरे प्यार की', 'चंद्रकांता' यासारख्या अनेक मालिका केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story