100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स

निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते.

जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.

या ब्लू झोनमध्ये जपान, ओकिनावा, ग्रीसचा इकारिया, कोस्टा रिकाचा निकोया, यूएसए आणि इटलीचा सार्डिनिया यांचा समावेश आहे.

ब्लू झोनमधील लोकांचे 90 टक्के अन्न संपूर्ण धान्यापासून तयार केलेले असते. त्यामध्ये हिरव्या भाज्या, मुळे, नट आणि बीन्समधून त्यांना 65% कॅलरीज मिळतात.

दीर्घकाळ जगण्यासाठी काही लोक मन शांत ठेवण्यासाठी दिवसातून अनेक वेळा प्रार्थना करतात. काही लोक जास्त झोप घेतात. त्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते.

ब्लू झोनमधील लोक त्यांच्या भुकेच्या पलीकडे कधीही जेवत नाहीत. रात्रीच्या जेवणात हलका आहार घेतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

ब्लू झोनमधील लोक त्यांच्या कुटुंबासह राहतात. वृद्ध लोकांची ते विशेष काळजी घेतात. त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याऐवजी ते घरीच ठेवतात.

VIEW ALL

Read Next Story