धर्मेंद्र, शबानाच नव्हे तर वयाच्या सत्तरीत 'या' कलाकारांनी दिले होते किसिंग सीन्स

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील एक सीन सध्या चर्चेत आहे. चित्रपटात 87 वर्षांचे धर्मेंद्र आणि 72 वर्षांच्या शबाना आझमी यांचा किसिंग सिन सध्या चर्चेत आहे. वयाच्या या टप्प्यातही किसिंग सिन करणाऱ्या अभिनेत्यावर एक नजर

शबाना आणि धर्मेंद्र

या वयात किसिंग सीन देण्याची तयारी दाखवणाऱ्या या दोन्ही कलाकारांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. त्यांच्या धाडसाचेही कौतुक केले आहे. मात्र, शबाना आणि धर्मेंद्र यांच्याव्यतिरिक्त अनेक असे कलाकार आहेत त्यांनी वयाची मर्यादा तोडत स्क्रीनवर असे सीन दिले आहेत.

नसीरुद्दीन शाह

या लिस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत. त्यांनी वयाच्या 60 ते 70 दरम्यान नसीरुद्दीन यांनी इंटिमेट सीन्स दिले आहेत.

डर्टी पिक्चर, इश्किया

नसीरुद्दीन यांनी डर्टी पिक्चर, इश्कियासारख्या चित्रपटात विद्या बालन यांच्यासोबत लिपलॉक केले आहे. इतकंच नव्हे तर, शूट ऑन साइटमध्ये त्यांनी ग्रीटा साच्चीमध्येही किसिंग सीन दिला आहे.

शक्ती कपूर

शक्ती कपूर यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र, वयाच्या सत्तरीत त्यांनी कर्मा चित्रपटात पुनम पांडेसोबत अनेक इंटीमेट व लिपलॉक सीन दिले आहेत.

राजेश खन्ना

राजेश खन्ना यांनीही वफाः अ डेडली लव्ह स्टोरीमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन

बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील या रेसमध्ये मागे नाहीयेत. त्यांनी निशब्द या चित्रपटात वयाच्या 65व्या वर्षी 19 वर्षांची दिवंगत अभिनेत्री जिया खानसोबत लिपलॉक केले होते. या चित्रपटामुळं त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला होता

लाइफ इन अ मेट्रो

रॉकी और रानी व्यतिरिक्त धर्मेंद्र यांनी लाइफ इन अ मेट्रो आणि दुश्मन देवतामध्येही लिपलॉक केले आहे. त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी नफीसा अली यांच्यासोबत किसिंग सिन दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story