पुष्पा 2 हा अल्लू अर्जुनआणि रश्मिका मंदानाचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.
रश्मिका मंदाना या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री असून रश्मिका श्रीवल्लीच्या भुमिकेत दिसेल.
अवघ्या एका आठव्यात पुष्पा 2 ने बॉक्स ऑफीसवर 726 कोटींची कमाई केली आहे.
पुष्पा 2 हा सिनेमा भारतासहीत जगभरात सुध्दा खूप गाजत असून, जागतिक स्तरावर याची कमाई 1060 कोटींच्या जवळपास आहे.
रश्मिका अल्लू अर्जुनहून बरीचशी लहान आहे. अल्लू अर्जुनच वय 41 वर्षे आहे तर रश्मिका 28 वर्षांची आहे.
दोघांच्या वयात 13 वर्षांचा फरक असला तरी पुष्पा आणि श्रीवल्ली यांच्या जोडीने कमालच केली आहे.
रश्मिका साउथ फिल्म इडस्ट्रीतील सर्वांत कमी वयाची अभिनेत्री असून, तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत.
काही बातम्यांनुसार ती विजय देवकोंडाला डेट करत असल्याच सांगितलं जातयं, पण सध्या दोघांपैकी कोणीही याचा खुलासा केलेला नाही.
या अभिनेत्रीचं नेटवर्थ 45 कोटींच्या जवळपास म्हटलं जात आहे.