चिकाच्या दुधाचा खरवस हा चवीला खूप चांगला लागतो
मात्र चिक दुध हल्ली मिळणे खूप मुश्कील असते. अशावेळी चिकाच्या दुधाशिवाय खरवस बनवू शकता
1 कप दूध, मिल्क पावडर,1-कप दही, कंडेन्स मिल्क 1 कप, वेलची पूड, अॅल्युमिनियम फॉइल 1 तुकडा, पाणी
एका मोठ्या पातेल्यात दूध ओतून घ्यावे या दुधात आता एक कप मिल्क पावडर घाला. संपूर्ण विरघळून घ्या.
नंतर त्यात दही टकावे आणि दही नीट एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर कंडेन्स मिल्क घालून ते एकजीव करुन घ्या. त्यावर वेलची पूड टाका.
आता अॅल्युमिनियम फॉइलने हे मिश्रण झाकून घ्या. आता एका भांड्यात पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवा. नंतर तयार झालेले मिश्रण ठेवून 30-40 मिनिटे वाफवून घ्या