चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात माहिच्या नव्या जर्सीची झलक दाखवण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोनीची IPL 2024 मध्ये नवी जर्सी कशी असणार, याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे.

एमएस धोनीच्या नेतृ्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 2023 मध्येही चेन्नई चॅम्पियन बनली होती.

आयपीएलच्या पहिल्या हंगमापासून म्हणजे 2008 पासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करतोय.

आता सतराव्या हंगामातही धोनी चेन्नईचं नेतृत्व करतोय. त्याचे फॅन्स त्याची आतुरतेने वाट पाहातायत.

आयपीएल 2023 दरम्यान धोनीने आपण आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं.

धोनीने 250 आयपीएल सामन्यात 5082 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 142 कॅच आणि 42 स्टम्पिंगची नोंद आहे.

VIEW ALL

Read Next Story