राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये एक तरुण चांगलाच चर्चेत होता. या तरुणाला महिलांसारखं दिसणं आवडतं.

या तरुणाचं नाव आहे करण असून तो फॅशन डिझायनर आहे. त्याला साडी नेसणं, लिपस्टिक लावणं, महिलांसारखं नटणं आवडतं.

करणने इंग्लंडमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर भारतात येऊन त्याने फॅशन डिझाईनरचं काम सुरु केलं.

फॅशन डिझाईनचं काम करत असताना करण समलैंगिक समुदायाशी जोडला गेला. आज तो अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतो.

एलजीबीटीक्यू समाजाला न्याय मिळावा यासाठी करण काम करतो.

विशेष म्हणजे करण केवळ भारतातच नाही तर इंग्लंडमध्ये साडी परिधान करत होता.

महिलांसारखी साडी, कुर्ती हा करणचा आवडता पोषाख आहे. आपल्या स्टाईलमुळे करण नेहमी चर्चेत असतो.

VIEW ALL

Read Next Story