पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे किडनी हेल्दी राहते.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी हेल्दी राहते.
जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवर दबाव येतो. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मीठ कमी प्रमाणात खावे.
उच्च रक्तदाबामुळे किडनी खराब होऊ शकते. तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या.
नियमित व्यायामामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे किडणीलाही फायदा होतो. आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम बेसिक व्यायाम करा.
काही औषधे किडनीला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)