खजूर कोणत्या वेळी खाल्ल्यानं शरीरावर होतो सर्वोत्तम परिणाम?

Sayali Patil
Dec 02,2024

रक्तदाब

रक्तदाबाची व्याधी असणाऱ्यांसाठी खजूर हे फळ एक वरदान आहे.

कमकुवतपणा

शरीरात सतत कमकुवतपणा असल्यास किंवा सतत सुस्ती येणाऱ्य़ांसाठीसुद्धा खजूर एक चांगला उर्जास्त्रोत आहे.

खजूर खाण्याची वेळ

अनेकांना मात्र खजूर खाल्ल्यानं शरीरावर कोणते परिणाम होताहेत हे लक्षात येत नाही. असं बऱ्याचदा खजूर खाण्याची वेळ चुकल्यामुळंही होतं.

योग्य वेळ

खजुरही योग्य वेळी खाणं महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी उपाशीपोटी खजूर खाणं अतिशय फायद्याचं.

योग्य पद्धत

खजूर खाण्याची योग्य पद्धत म्हणजे, रात्रभर ते पाण्यात भिजवत ठेवून सकाळी उपाशी पोटी त्यांचं सेवन करणं.

शरीरावरील परिणाम

खजूर भिजवून ठेवलेलं पाणी न फेकता ते पिणंही फायद्याचं. थोडक्यात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं खजूर खाल्ल्यास शरीरावर त्याचा कायम सकारात्मक परिणाम होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story