अभिनेत्री ते राजकारण

खुशबू सुंदर यांनी 'द बर्निग ट्रेन' मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर दक्षिणेत त्यांनी चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांचं तिथे मंदिरही बांधण्यात आलं आहे. 2010 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

आजही सतावतात भयानक आठवणी

पतीला देव मानणारी माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का याबद्दल मला शंका होती. पण वयाच्या 15 व्या वर्षी आता खूप झालं असा विचार मी केला. वडिलांनी दिलेली ही भयानक आठवण खुशबू आजही विसरलेल्या नाहीत.

16 व्या वर्षी केला विरोध

माझे वडील त्यांच्या एकुलत्या एका मुलीवर लैंगित अत्याचार करत होते. मी 15 वर्षांची झाल्यानंतर याच्या विरोधात बोलण्याची हिंमत झाली असं त्यांनी सांगितलं आहे.

वडिलांनी दिली आयुष्यभराची जखम

माझ्या आईला एका वाईट वैवाहिक आयुष्य जगावं लागलं आहे. आपल्याला पत्नी आणि मुलीला मारहाण करण्याचा अधिकार आहे असं त्यांना वाटत होतं असंही त्यांनी सांगितलं.

वयाच्या 8 व्या वर्षी भयानक अनुभव

जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतात तेव्हा त्या जखमा आयुष्यभरासाठी राहतात असं खुशबू सुंदर म्हणाल्या आहेत. यामध्ये मुलगा किंवा मुलगी असल्याचा संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

वडिलांकडून लैंगिक अत्याचार

खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, 8 वर्षांच्या असताना वडिलांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

अभिनेत्रीचे वडिलांवर गंभीर आरोप

अभिनेत्री आणि राजकीय नेत्या खुशबू सुंदर यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या आयुष्यातील हे धक्कादायक वास्तव त्या कधीच विसरु शकणार नाहीत.

VIEW ALL

Read Next Story