'लस्ट स्टोरीज-2'साठी कोणी किती मानधन घेतलं?

'लस्ट स्टोरीज-2'मध्ये अनेक कलाकार झळकले असून त्यांच्या मानधनाचा आकडाही थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात याबद्दलच...

'लस्ट स्टोरीज-2'ची चर्चा

सध्या सोशल मीडियावर 'लस्ट स्टोरीज-2'ची चांगलीच चर्चा आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या चारही स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत.

कोणी किती मानधन घेतलं?

'लस्ट स्टोरीज-2' चित्रपटामध्ये काजोल, नैना गुप्ता, तमन्ना भाटिया, मृणाल ठाकूर यासारख्या अभिनेत्रींची अदाकारी पाहायला मिळत आहे. मात्र या अभिनेत्रींना 'लस्ट स्टोरीज-2'साठी किती मानधन देण्यात आलं आहे माहितीये का? याचबद्दल जाणून घेऊयात...

अमृता सुभाषचीही खास भूमिका

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषही 'लस्ट स्टोरीज-2'मधील 'द मीरर' या भागात मोलकरणीची भूमिका साकारताना दिसली.

25 लाखांचं मानधन मागितलं

मनोरंजन सृष्टीमधील चर्चांनुसार अमृताने 'लस्ट स्टोरीज-2'मधील या भूमिकेसाठी 25 लाखांचं मानधन मागितलं होतं.

'सेक्स विथ एक्स'मध्ये तमन्ना

बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तमन्ना भाटियाने या चित्रपटातील 'सेक्स विथ एक्स' या भागात काम केलं आहे.

तमन्नाचं मानधन किती

तमन्नाने 'लस्ट स्टोरीज-2'मधील या भूमिकेसाठी तब्बल 4 कोटींचं मानधन घेतल्याच्या बातम्या अनेक वेबसाईट्सने छापल्या आहेत.

देहविक्रेय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत काजोल

अमित मिश्रांनी दिग्दर्शित केलेल्या 'तिलचट्टा' या भागात काजोलने देहविक्रेय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आहे.

काजोलचं मानधन किती?

काजोलने 'लस्ट स्टोरीज-2' या भूमिकेसाठी तब्बल 2 कोटींचं मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.

मृणाल ठाकूरने साकारली नात

'मेड फॉर इच अदर' या कथेमध्ये निना गुप्ता यांच्या नातीची भूमिका अभिनेत्री मृणाल ठाकूरने साकारली आहे.

मृणाल ठाकूरचं मानधन किती?

मृणाल ठाकूरने 'लस्ट स्टोरीज-2'मधील या भूमिकेसाठी तब्बल 3 कोटींचं मानधन घेतल्याचं समजतं.

निना गुप्ता आजीच्या भूमिकेत

आर. बाल्कींनी दिग्दर्शित केलेल्या 'मेड फॉर इच अदर' या कथेमध्ये निना गुप्ता यांनी काम केलं आहे.

निना गुप्तांचं मानधन किती?

निना यांनी या कथेत आजीची भूमिका साकारली आहे. 'लस्ट स्टोरीज-2' या भागातील कामासाठी त्यांनी 1 कोटींचं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

विजय वर्माही झळकला

'सेक्स विथ एक्स' या भागात तमन्नाबरोबर अभिनेता विजय वर्माने स्क्रीन शेअर केली आहे.

विजय वर्माला किती मानधन देण्यात आलं?

'लस्ट स्टोरीज-2'मधील या भूमिकेसाठी विजय वर्माला 35 लाख मानधन देण्यात आल्याचं समजतं.

अधिकृत खुलासा नाही

मात्र मानधनाची ही सर्व आकडेवारी केवळ कथित असून यासंदर्भातील कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

VIEW ALL

Read Next Story