अभिनेत्री दीपिका चिखलिया सीतेच्या भूमिकेत दिसली होती. दीपिकाने सीतेचं पात्र असं उचलून धरलं की, लोकं तिची देवाप्रमाणे पूजा करू लागले होते आणि तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी रांगेत उभे रहायचे.
रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. बीआर चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी मिळून 'रामायण' ही मालिका बनवली होती. या शोमध्ये नितीश भारद्वाज यांनी श्री राम आणि अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती.
2008 रामायण या मालिकेत देबिना बॅनर्जीने सीतेची भूमिका साकारली होती. एनडीटीव्ही इमॅजिनवर प्रसारित होणारे हे रामायणही हिट ठरलं होतं.
2015 मध्ये पहिल्यांदा सीतेला केंद्रस्थानी ठेवून 'सिया के राम' ही मालिका बनवण्यात आली होती. अभिनेत्री मदिराक्षी मुंडले सीतेच्या भूमिकेत दिसली आणि अभिनेता आशिष शर्माने भगवान श्री रामची भूमिका साकारली.
2019 मध्ये, कलर्स वाहिनीवर राम-सीतेची कथा पुन्हा दाखवण्यात आली, मात्र यावेळी राम-सियाची मुलं लव-कुश यांच्या दृष्टीकोनातून. कलर्सवर 'राम सिया के लव-कुश' ही मालिका सुरू झाली. या शोमध्ये अभिनेत्री शिव्या पठानियाने सीतेची भूमिका साकारली होती.
मोहित रैना स्टारर सीरियल 'देवों के देव महादेव' ही स्टार इंडियाच्या सुपरहिट मालिकांपैकी एक होती. शोमध्ये रामायण अध्याय दाखवला गेला तेव्हा सीतेची भूमिका अभिनेत्री रुबिना दिलीकने साकारली होती.
2012 मध्ये सागर आर्ट्सने तिसऱ्यांदा रामायण बनवलं. 'रामायण: सबके जीवन का आधार' या मालिकेत अभिनेत्री नेहा सरगम 'सीता' बनली होती. पण हे रामायण फ्लॉप ठरलं.