सीतेच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने नॉन-व्हेज खाणे सोडले
या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेसाठी नॉन-व्हेज खाणं सोडलं. एवढेचं नाही तर खाजगी आयुष्यामुळे प्रेक्षकांनी विरोध केल्यानं इंडस्ट्री सोडण्याचे ठरवलेले.
2011 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता बापू यांचा 'श्री राम राज्यम' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नयनताराने सीतेची भूमिका केली होती.
या भूमिकेची घोषणा होताच तिच्या जीवनात मोठा बदल झाला. कारण, चित्रपटात तिचं नाव जाहीर होताच तिला तमिळ आणि तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीमध्ये तिला प्रचंड टीका सहन करावी लागली.
'श्री राम राज्यम' चित्रपटात काम करत असताना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तिला खूप विरोध सहन करावा लागला होता.
नयनतारा आणि प्रभुदेवा यांचे रिलेशन खूप चर्चेत होते आणि नयनतारा-सिलंबरासनसोबतचे ब्रेकअपही चर्चेत होते. त्यामध्ये वाद देखील होता की, तिच्या डेटिंग लाईफच्यामध्ये तिला सीतेची भूमिका कशी देण्यात आली.
नेटफ्लिक्सवरील नयनताराची डॉक्युमेंटरी 'बियॉंड द फेयरीटेल' मध्ये तिच्या टीमच्या एका सदस्याने सांगितले की, सीतेच्या भूमिकेची उत्तम प्रकारे सादर करण्यासाठी नयनताराने खूप मेहनत घेतली होती.
शूटिंगदरम्यान तिने नॉन-व्हेज खाणे पूर्णपणे सोडले होते. ती ताज कृष्णा हॉटेलमध्ये राहिली पण तिने तेथील नॉन-व्हेज आणि पाणी देखील पिणे टाळले
वैयक्तिक जीवनात असलेल्या उलथापालथीनंतर, नयनताराने 2011 आणि 2012 दरम्यान, इंडस्ट्रीपासून काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर एक वर्षाने ती पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परतली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले.