रश्मिकानं फार कमी वयात लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिच्याविषयी सगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात.
रश्मिकासोबत तिच्या बहिणीची देखील तितकीच चर्चा होते. अनेकांना प्रश्न पडतो की खरंच रश्मिकाची ती बहीण आहे का किंवा काय कारण आहे. तर ती तिची सख्खी बहीण आहे.
रश्मिकाच्या लहान बहिणीची नाव शीमन मंदाना आहे. रश्मिका आणि शीमनमध्ये 17 वर्षांचा फरक आहे.
शीमन इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. ती नेहमीच रश्मिका आणि कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
रश्मिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती तिच्या बहिणीला मोठं होताना पाहू शकली नाही. ती तिच्या बहिणीसाठी दुसऱ्या आईसारखी होती.
तिचे डायपर बदलण्यापासून, तिला खाऊ घालायचं आणि तिला अंघोळ करण्यापासून सगळ्या गोष्टी रश्मिकानं केल्या आहेत. शीमन ही 11 वर्षांची आहे तर रश्मिका ही 28 वर्षांची आहे.