दररोज खा फक्त 1 गाजर; शरिरात दिसतील आश्चर्यकारक बदल

Shivraj Yadav
Nov 28,2024

जर शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर मोसमातील हिरव्या भाज्या, फळं खाणं सर्वोत्कृष्ट असतं. असंच एक कंदमूळ म्हणजे गाजर.

जर तुम्ही रोज 1 गाजर जरी खाल्लं तरी शरिराला अनेक फायदे मिळतात. याबद्दल जाणून घ्या.

गाजरामध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम आणि तांबे यांसारखी आवश्यक खनिजे असतात.

यासह त्यात फायबर आणि कार्बोहायड्रेट्सही असतात.

गाजरात 86 ते 95 टक्के पाणी असतं. गाजरांमध्ये प्रथिनंही असतात.

व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त, गाजरमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी 6 देखील भरपूर असते.

गाजर थंडीत शरीराला हायड्रेट ठेवतं

रोज गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारते. तसंच कर्करोगाचा धोका कमी होतो.

गाजराचं सेवन वजन नियंत्रणातही मदत करतं.

जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

VIEW ALL

Read Next Story