गाजर खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशार आहे. महिलांसाठी तर गाजर वरदान आहे.
गाजर अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, अ, ब, क जीवनसत्त्व असते.
डोळे, यकृत, किडनी तसेच संपूर्ण शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.
गाजरामध्ये कॅरोटिन हा घटक असतो. केसांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे.
मुरुम, पीएमएस, मूड स्विंग यासह विविध हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतील तर गाजराचे सेवन फायदेशीर ठरते.
गाजराच्या सेवनाने रक्त शुद्ध होऊन संपूर्ण शरीराला सुरळीत रक्त पुरवठा होतो.
गाजराचा पिवळा भाग गरम असतो. यामुळे याचे अधिक सेवन केल्यास पोटात उष्णता आणि घशात जळजळ होऊ शकते.
स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त प्रमाणात गाजर खाल्ल्यास दुधाची चव बदलू शकते.