जर तुम्हाला घसा खवखवत असेल तर काहीवेळा तुम्हाला खाताना किंवा बोलतानाही त्रास होतो.
यावर काही नैसर्गिक गोष्टी औषधांप्रमाणे काम करतात ज्या केवळ घसादुखीपासून आराम देतात.
काळी मिरी बारीक करून देशी तुपासोबत किंवा मधासोबत घेऊ शकता. याशिवाय चहामध्ये काळी मिरी टाकून प्यायल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल.
घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी कच्ची हळद आणि थोडे मीठ पाण्यात उकळून ते पाणी गाळून दिवसातून दोन ते तीन वेळा गार्गल करा. यामुळे आराम मिळेल.
जर तुम्हाला घसा खवखवत असेल तर कोरड्या आल्याचा एक छोटा तुकडा दाताखाली दाबा, यामुळे रस हळूहळू घशापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला आराम वाटेल.
घसा खवखवत असल्यास तुळशीचा काढा करून पिऊ शकता. यामुळे सर्दी-खोकल्यापासूनही बराच आराम मिळतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)