सतत Earphones वापरतायं?

होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार

इअरफोन्स आपल्या जीवनशैलीचा एक भाग

आजकाल ऑटो असो की बस, मेट्रो असो की रोड, सगळीकडे तुम्हाला इअरफोन किंवा हेडफोन घातलेले लोक दिसतील. चित्रपट पाहण्यापासून ते तुमची आवडती गाणी ऐकण्यापर्यंत इअरफोन्स हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.

इअरफोन्सचा ट्रेंड

कधी फोनवर बोलण्यासाठी तर कधी ऑनलाइन क्लासेससाठी इअरफोन्सचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. या सगळ्यामध्ये इयरफोन्स आपल्यासाठी किती हानिकारक आहेत हे आपण विसरलो.

कानाच्या पडद्याला इजा

इअरफोनमधून बाहेर पडणारा आवाज कानाच्या पडद्याला जवळून आदळतो, अशावेळी कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. समस्या अधिक वाढल्यास बहिरेपणाचा धोकाही वाढतो.

शरीरावर अनेक वाईट परिणाम

गेल्या 10 वर्षात पोर्टेबल इअरफोन्समधून येणार्‍या मोठ्या आवाजातील संगीताचे अनेक परिणाम पाहिले गेले आहेत. लोक हेडफोन तासनतास कानात घालून बसतात. ज्यामुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात ही चिंता वाढत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज

हेडफोन किंवा इअरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील सुमारे 100 दशलक्ष तरुणांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.

कान दुखणे

जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानांवर वाईट परिणाम होतो. यामुळे कानात वेदना होऊ शकतात. ही वेदना तीव्र देखील असू शकते, ज्यामुळे कानात जडपणाची शक्यता वाढते.

बहिरेपणा

जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानांच्या नसांवर दबाव पडतो. त्यामुळे नसा सूजण्याची शक्यता असते. कंपनामुळे, श्रवण पेशी त्यांची संवेदनशीलता गमावू लागतात आणि अनेक वेळा बहिरेपणा देखील होऊ शकतो.

डोकेदुखीचा धोका

दररोज इअरफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणे तुमच्या कानांसाठी हानिकारक असू शकते. यामुळे कानालाच नाही तर मेंदूलाही खूप नुकसान होते. संगीताच्या तीव्र कंपनामुळे आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश असे आजारही होऊ लागतात.

कान सुन्न होणे

इयरफोन्सच्या साहाय्याने दीर्घकाळ गाणे ऐकल्याने तुमचे कान सुन्न होऊ शकतात. मोठ्या आवाजात गाणे ऐकल्यानेही मानसिक त्रास होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इयरफोनच्या जास्त वापरामुळे कानात टिनिटस होतो, त्यासोबतच चक्कर येणे, झोप न लागणे, डोके आणि कानात दुखणे इत्यादी लक्षणे देखील दिसतात.

ही गोष्ट नक्की करा

तुम्हालाही कानाची समस्या टाळायची असेल, तर इअरफोन फक्त गरज असेल तेव्हाच वापरावे.

ही गोष्ट टाळा

स्वस्त इअरफोन्सऐवजी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरावे.

दिवसातून किती वेळ वापरावे?

इअरफोन्स दिवसातून 60 मिनिटेच वापरावेत, असे डॉक्टरांचे मत आहे

VIEW ALL

Read Next Story