एखादी व्यक्ती दर दिवशी दूध पित असल्यास अचानक त्या व्यक्तीनं ही सवय सोडल्यास शरीरावरही या बदलांचे परिणाम होतात.
दूध न प्यायल्यामुळे कॅल्शियम आणि विटामिन डीची पातळी खालावण्याची भीती असते.
हाडं आणि दातांच्या बळकटीसाठी दुधाची फार मदत होते, कारण दूध हा प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत आहे.
दूध पिण्याची सवय सोडल्यास शरीराला प्रथिनांची कमतरता भासू शकते.
दुधात असणाऱ्या लॅक्टोजमुळं अनेकांनाच पचनक्रियेतील बिघाडाची समस्या सतावू शकते.
अनेकांनाच दुधाची अॅलर्जीसुद्धा असते. ज्यामुळं काहींनी ही सवय टाळलेली बरी.