व्होडफोन आयडियाने नवा सुपर हिरो प्लॅन लाँच केला आहे. हा एक युनिक प्लॅन आहे, जो युजर्सला 12 तासांसाठी फ्री डेटा ऑफर करतो.
VI ने अशी ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने याआधीही अनेक प्लॅन्समध्ये फ्री अनलिमिटेड डेटाची ऑफर दिली आहे. या प्लॅनमध्ये रात्री 12 पासून ते सकाळी 6 पर्यंत फ्री डेटा मिळतो.
सुपर हिरो प्लॅनमध्ये युजर्सला 12 तासांसाठी फ्री डेटा मिळतो. युजर्सला रात्री 12 वाजल्यांपासून दुपारी 12 वाजेपर्यंत फ्री डेटा मिळेल.
कंपनीचं म्हणणं आहे, उर्वरित अर्ध्या दिवसात युजर्सना अतिरिक्त डेटा बेनिफिट्स मिळतील. ज्यामुळे ते कनेक्टेड राहतील.
या प्लॅनमध्ये फक्त इतकंच नाही तर इतर सुविधाही आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळेल.
म्हणजे वाचलेला डेटा तुम्ही आठवड्यात वापरु शकता. तसंच कंपनी डेटा डिलाइट ऑफरही देत आहे.
यामध्ये युजर्स एका महिन्यात दोन वेळा 2GB एक्स्ट्रा डेटा विना कोणत्याही अतिरिक्त चार्ज अनलॉक करु शकणार आहेत. हा डेटा Vi App किंवा 121249 वर डायल करुन अॅक्टिव्ह केला जाईल.
सुपर हिरो प्लॅन वेगळा खरेदी करण्याची गरज नाही. कंपनी डेली 2GB डेटा प्लॅनसह ही सुविधा मोफत देत आहे. या प्लॅनची सुरुवात 365 रुपयांपासून होत आहे.