लघवीच्या 6 आजारांवर फायदेशीर आहे हिरवं रोपटं; कसा कराल वापर?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 16,2024


आयुर्वेदानुसार पानफुटी किडनी आणि लघवीशी संबंधित आजारांवर अतिशय प्रभावशाली आहे. याचा वापर करुन अनेक आजार दूर होतात.


पानफुटी किडनी स्टोन किंवा त्याच्याशी संबंधित इतर आजारांवर फायदेशीर मानले जाते. तसेच शरीरातील घाणेरडे पदार्थ देखील बाहेर पडण्यास मदत होतात.


आयुर्वेदानुसार, पानफुटीला भष्मपथरी, पाषाणभेद आणि पत्थरचट्टा असे देखील म्हटले जाते. यामुळे कोणत्या समस्या दूर होतात ते जाणून घेऊया.

लघवीला जळजळ

लघवीच्या वेळी जलजळ होणे ही समस्या पानाफुटीच्या काढ्याने पूर्णपणे बरी होऊ शकते. पानफुटीची पाने उकळून सकाळी त्याचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

युरिन इन्फेक्शन

आयुर्वेदानुसार, पानफुटीचा वापर हजारो वर्षांपासून असलेल्या लघवीच्या इन्फेक्शनवर उपाय म्हणून केला जातो. या पानांचा रस सकाळी नियमितपणे प्यायल्यास फायदेशीर ठरतो.

यूटीआय समस्या

यूटीआयच्या समस्येवर पानफुटीचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. पानफुटीच्या ताज्या पानांचा काढा अतिशय फायदेशीर ठरतो. यामुळे लगेच आराम मिळत.

योनीमार्गातील संसर्ग

योनीमार्गातील संसर्गासाठी पानफुटीचा काढा अतिशय गुणकारी आहे. याचे नियमित सेवन केल्यामुळे खास, जळजळसारखी समस्या कमी होते. याचे सेवन मधासोबत करावे.

थांबून लघवीला होणे

लघवी थांबून होत असेल तर पानफुटीचे आयुर्वेदीक औषध अतिशय फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी मधासोबत सेवन केल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

योनीस्त्रावाची समस्या

योनिस्त्रावाची समस्या असेल तर पानफुटीचा काढा गुणकारी असतो. व्हजायनल डिस्चार्जमुळे अनेकदा संसर्ग होण्याची शक्यता असते. पानफुटीच्या काढ्याने या समस्या दूर होतात.

महत्त्वाचं

पानफुटीचे सेवन करण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण हा काढा प्रत्येकालाच फायदेशीर ठरेल असं नाही.

VIEW ALL

Read Next Story