कधी कधी दुध ऊतू गेलं तरी आपलं लक्ष नसतं, तर कधी कामाच्या गडबडीत दूधाचे भांडे करपून जाते. अशावेळी काळे कुळकुळीत झालेले दुधाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
करपलेले दुधाचे भांडे स्वच्छ निघण्यासाठी चार-पाच दिवस जातात. तरीही काळे डाग पूर्णपणे निघत नाहीत. अशावेळी या सोप्या टिप्स वापरुन भांडे चकचकीत निघेल.
एका भांड्यात पाणी गरम करुन घ्या त्यानंतर एका मोठ्या थाळ्यात ते पाणी टाका.
आता या पाण्यात 2 चमचे व्हिनेगर, 2 चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाच्या साली टाका
त्यानंतर आता या पाण्यात करपलेले भांडे ठेवा तसंच, यातील थोडे पाणी भांड्यातही टाका
थोड्याच वेळात करपलेल्या भांड्यातील काळे आणि चिकट डाग निघण्यास सुरुवात होईल
1-2 तास करपलेले भांडे भिजत ठेवल्यानंतर सगळा चिकटपणा दूर होईल. त्यानंतर साबणाने भांडे घासून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या