सकाळी नाश्तासाठी इडली हमखास बनवली जाते. पण कधीकधी इडली मऊ आणि लुसलुशीत होत नाही. अशावेळी काय करायचे? असा प्रश्न पडतो.

Mansi kshirsagar
Aug 06,2023


ईडलीचे पीठ नीट फुगले नाही तर इडल्या कडक होतात. अशावेळी इडलीचे पीठ कसे तयार करायचे याच्या सोप्या टिप्स

साहित्य

3 कप तांदूळ 1 कप उडीद डाळ 1/2 टीस्पून खायचा सोडा मीठ स्वादानुसार तेल गरजेनुसार पाणी गरजेनुसार


सगळ्यात पहिले तांदूळ आणि उडीद डाळ धुवून साफ करुन धुवून घ्या. त्यानंतर 6 ते 7 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा


त्यानंतर तांदळात पाणी काढून मिक्सरला वाटून पीठ तयार करा. तसंच, उडीद डाळदेखील अशाचप्रकारे वाटून घ्या. त्यानंतर दोन्ही पेस्ट एकत्र करुन घ्या. या मिश्रणात मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करुन घ्या. व हे पीठ गरम जागेवर ठेवा.


दुसऱ्या दिवशी इडली तयार करताना इडलीच्या साच्याला तेल लावून घ्या त्यावर इडलीचे मिश्रण टाका. त्यानंतर इडलीच्या भांड्यात दोन कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. त्यानंतर इडल्या त्यात ठेवून द्या.


गॅसवर 8 ते 10 मिनिटांसाठी मोठ्या आचेवर इडल्या शिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा.


आता चाकूच्या मदतीने साच्यातून इडली काढून प्लेटमध्ये काढा. त्यानंतर गरमागरम सांभार आणि नारळाच्या चटणीसोबत खा.

VIEW ALL

Read Next Story