कोंड्यामुळे डोक्यात सारखी खाज येते ? 'हे' घरगुती उपाय करून तर पाहा
थंडीमध्ये अनेकांना कोंड्याची समस्या होते. ज्यामुळे डोक्यात सतत खाज येते.
बऱ्याचदा आपण इतक्या जोरात डोकं खाजवू लागतो की त्यामुळे डोक्यावर असणाऱ्या त्वचेतून रक्तही येऊ लागते.
'या' घरगुती गोष्टी वापरून तुम्ही कोंड्यापासून दूर राहू शकता.
अॅलोवेरा जेल डोक्याला लावल्यानं खाजच नव्हे, तर कोंडाही कमी होऊ लागतो. यासाठी कोरफडीचा गर डोक्याला लावून ठेवावा आणि एका तासानंतर शॅम्पूने केस धुवावेत. असं केल्याने डोक्यावरील कोंडा कमी होतो.
एक चमचा बेकिंग सोडामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट बनवून डोक्यावर लावावी आणि 5-10 मिनिटांनंतर केस/ डोकं धुवावं; त्यानं कोंडा कमी होतो.
कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि खाज कमी होते. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून केसांना लावावी.
मेथी दाण्यांची पेस्ट बनवून दह्यामध्ये मिसळावी. ही पेस्ट डोक्याला अर्धा तास लावून ठेवावी आणि त्यानंतर केस धुवावेत. यामुळे डोक्यामधील खाज कमी होते.
2 ते 3 चमचे नारळाच्या तेलात 1 चमचा लिंबाचा रस घालून डोक्याला मसाज करावा आणि 20-30 मिनिटांनंतर केस धुवावेत. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)