रक्तदाबाची व्याधी असणाऱ्यांसाठी खजूर हे फळ एक वरदान आहे.
शरीरात सतत कमकुवतपणा असल्यास किंवा सतत सुस्ती येणाऱ्य़ांसाठीसुद्धा खजूर एक चांगला उर्जास्त्रोत आहे.
अनेकांना मात्र खजूर खाल्ल्यानं शरीरावर कोणते परिणाम होताहेत हे लक्षात येत नाही. असं बऱ्याचदा खजूर खाण्याची वेळ चुकल्यामुळंही होतं.
खजुरही योग्य वेळी खाणं महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी उपाशीपोटी खजूर खाणं अतिशय फायद्याचं.
खजूर खाण्याची योग्य पद्धत म्हणजे, रात्रभर ते पाण्यात भिजवत ठेवून सकाळी उपाशी पोटी त्यांचं सेवन करणं.
खजूर भिजवून ठेवलेलं पाणी न फेकता ते पिणंही फायद्याचं. थोडक्यात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं खजूर खाल्ल्यास शरीरावर त्याचा कायम सकारात्मक परिणाम होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)