बाबासाहेबांचं खरं आडनाव काय होतं?

Pravin Dabholkar
Nov 28,2024


भारतीय लोकशाही मजबूत करण्यात राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वाचा वाटा आहे.बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमध्ये झाला होता.


असे असले तरी त्यांचे मूळ गाव रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे.


भीमाईच्या पोटी जन्म घेतलेल्या पुत्राचे नाव भीम असे ठेवण्यात आले. पुढे त्याचा भीमराव असे उल्लेख होऊ लागला. लोकं प्रेमाने त्यांना बाबा म्हणायचे.


देशातच नव्हे तर संपूर्ण जगात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना ओळखले जाते. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली जाते.


पण बाबासाहेबांचे खरे आडनाव काय होते? हे तुम्हाला माहिती आहे का?


डॉ. भीमराव आंबेडकर यांचे खरे आडनाव सकपाळ असे होते.


पण बाबासाहेबांच्या वडिलांना आपल्या नावासमोर हे आडनाव नको होते.


म्हणून त्यांनी नावासमोर आपल्या गावचे नाव जोडले.


बाबासाहेबांच्या गावाचे नाव आंबडवे होते.


त्यानुसार त्यांचे नाव आंबावडेकर असायला हवे होते.


पण एका शिक्षकांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आपल्या नावातून सकपाळ हटवून आंबेडकर आडनाव लावले.

VIEW ALL

Read Next Story