आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येकाला काही ना काही गुंतवणूक करायला हवी.
छोट्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी हे बेस्ट माध्यम आहे.
छोट्या रक्कमेने सुरुवात आणि मोठे रिटर्न हे यामागचे कारण आहे.
कमाईनुसार किती गुंतवणूक एसआयपीमध्ये टाकायला हवी? असा प्रश्न मनात येतो.
जर तुम्हील महिन्याला 45 हजार रुपये कमावत असाल तर तुम्हाला 50:30:20 फॉर्मुलानुसार गुंतवणूक करायला हवी.
यानुसार 50 टक्के रक्कम गरजा पूर्ण करण्यासाठी, 30 इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि 20 टक्के कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूकीसाठी ठेवायला पाहिजेत.
तुमच्या पगारानुसार तुम्ही याची गणना करु शकता.
जर तुम्ही 45 हजार कमावत असाल तर 20 टक्के म्हणजेच 9000 रुपये गुंतवायला हवेत.