भारतात गंगा नदीला पवित्र मानलं जातं. देवी-देवतांप्रमाणे गंगा नदीची पूजा केली जाते.
गंगा नदी देशातील सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदीची लांबी जवळपास 2525 किलोमीटर इतकी आहे.
भारतातून वाहणारी गंगा नदी शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये पोहोचते.
गंगा नदी भारत आणि बांगलादेशदरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा देखील मानली जाते.
पण बांगलादेशमध्ये पोहोचतात गंगा नदीचं नाव बदलतं.
बांगलादेशमध्ये गंगा नदीला पद्मा या नावाने ओळखलं जातं.
बांगलादेशमध्ये गंगा नदीचा प्रवाह साधारण 355 किमी इतका आहे.