सासू आणि सून हे नातं दोन पिढ्यांचं आहे हे समजून घ्या. यामध्ये अंतर असणारच याचा स्वीकार करा.
सून तुम्हाला का आवडत नाही याचा विचार करा. अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला खटकतात हे समजून घ्या.
सुनेबद्दल असलेले विचार पहिले बदला. एक स्त्री किंवा एक माणूस म्हणून पाहा आणि तिला स्पेस द्या.. नात हळूहळू सुधारेल.
नवीन व्यक्तीला नात्यात कायमच समजून घेणे गरजेचे आहे. तिच्यासाठी हा वेगळा अनुभव असेल. सुनेला वेळ द्या.
सुनेवर तुमच्या घराचं रुटीन लादू नका. तिला तिचा मोकळा वेळ घ्या. विनाकारण त्रास न देता समजून घ्या.
सुनेच्या मतांचा आदर करा. काही जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवा आणि त्या उत्तमपणे सांभाळल्या तर त्यावर कौतुक करायला विसरु नका.
हे कुटुंब तिचं देखील आहे त्यामुळे सुनेला निवडीचं स्वातंत्र्य द्या. तिच्या मतांचा आदर करा.
वाद टाळा सुनेशी संवाद साधा. रागावण्याऐवजी किंवा अबोला धरण्याऐवजी बोला शांतपणे संवाद साधा.
सुनेसोबत नातेसंबंध चांगले करा हे तिच्या आणि तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.