महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियातून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ आयपीएल खेळताना दिसतो.
टीम इंडियातून निवृत्त झालेल्या खेळाडुंना बीसीसीआय पेन्शन देते.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2 वर्ल्ड कप, 1 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि डझनभर ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियासाठी 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी ट्वेंटी मॅच खेळल्या आहेत.
धोनीला दरवर्षी आयपीएल मॅच खेळून कोट्यावधीची कमाई होते.
धोनी वेगवेगळ्या व्यवसायात आहे. त्यामुळे धोनीचे नेटवर्थ 1 हजार कोटी इतके आहे.
तो टीम इंडियाच्या श्रीमंत खेळाडुंच्या यादीत येतो.
बीसीसीआयच्या नियमानुसार, 25 हून जास्त मॅच खेळणाऱ्या खेळाडूंना 70 हजार रुपये पेन्शन दिली जाते. जी आधी 50 हजार रुपये इतकी होती.
महेंद्रसिंग धोनीला 70 हजार रुपये इतकी पेन्शन मिळते.
धोनीचे नेटवर्थ पाहता तो बीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून नाही.