हिरव्या वेलीचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खनिजे असतात.
सकाळी वेलचीची चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात.
वेलचीची चहा प्यायल्याने पोटातील गॅस, अपचन, ऍसिडिटी इत्यादींपासून आराम मिळतो. कारण यात नैसर्गिक एंझाइम असते.
वेलीचीच्या चहामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे घशाला होणाऱ्या खवखवी पासून आराम मिळतो.
वेलचीच्या चहामध्ये अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वेलचीची चहा शरीरातील आयरन आणि पोटँशियमचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो.
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी वेलचीची चहा फायदेशीर ठरते. यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)