उन्हाळ्यात प्रत्येक घरात आंबे खायला आणले जातात. प्रत्येक सिझनमध्ये अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात.
घरांमध्ये 5-6 डझन आंबे एकाचवेळी आणले जातात. प्रत्येकाला रोज थोडे थोडे खायचे असतात. अशावेळी आंबे लवकर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात.
आंबे जास्त काळ फ्रेश ठेवणे कठीण आहे. पण काही टिप्स फॉलो करुन तुम्ही हे करु शकता.
आंबे पिकण्याची प्रक्रिया हळू करण्यासाठी ते फ्रिजरमध्ये 10 ते 13 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवा.
अशाने आंबे जास्त काळ फ्रेश राहतील.
आंब्यातील ओलावा शोशून घेण्यासाठी, जास्त पिकण्याची प्रक्रिया स्लो करण्यासाठी ते पेपर बॅगमध्ये ठेवावेत.
यामुळे ते लवकर खराब होत नाहीत.
जास्त शेल्फ लाईफसाठी आंबे कापून फ्रीजर सेफ बॅगेत ठेवा.
एथिलिन गॅसमुळे आंबे खराब होतात. अशावेळी पिकलेले आणि कच्चे आंबे वेगवेगळे ठेवा.
आंब्याची कापे करा. फ्रीजमध्ये एका कंटेनरमध्ये ठेवा.