श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करतात.

श्रावणातील उपवासाकरिता मऊ - लुसलुशीत साबुदाणा आलू पराठा रेसिपी नक्की ट्राय करा.

साबुदाणे, बटाटे, मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ इतकं साहित्या लागणार आहे.

सर्वप्रथम साबुदाणे हकल्या आचेवर दोन ते तीन मिनीट भाजून घ्या. भाजलेल्या साबुदाणे मिक्सरमध्ये पीठासारखे बारीक करा.

चार ते पाच बटाटे उकडून घ्या आणि चांगले स्मॅश करा.

स्मॅश केलेले बटाटे साबुदाण्याच्या पिठात मिक्स करा. यात बारीक कापलेली मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घाला.

सर्व मिश्रण थोडे थोडे पाणी घालून एकजीव मळून घ्या. 5 मिनीट हे मिश्रण भिजू द्या.

या भिजवलेल्या मिश्रणाचे फुलक्याच्या आकाराचे पराठे लाटून तव्यावर चांगले भाजून घ्या.

साबुदाणा आलू पराठा दह्यासोबत खूपच टेस्टी लागतो.

VIEW ALL

Read Next Story