रेल्वे स्टेशनला हिंदीत काय म्हणतात? 99.99 % स्कॉलरही नाही देऊ शकले याचं उत्तर
तुम्ही ज्या रेल्वेनं प्रवास करता ती रेल्वे पकडण्यासाठी अर्थात त्यामध्ये बसण्यासाठी तुम्हाला एके ठिकाणी जावं लागतं. ते ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन.
रेल्वे स्टेशनवर तुम्ही आजपर्यंत अनेकदा गेला असाल. विविध वेळांमध्ये तुम्ही तिथलं चित्र पाहिलं असेल.
प्रवाशांची गर्दी, तिकीट खिडकीवरील रांगा आणि ये- जा करणाऱ्या रेल्वेगाड्या हे असंच काहीसं रेल्वे स्थानकांवर अर्थात रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतं.
मराठीमध्ये तुम्ही रेल्वे स्थानक म्हणता त्या रेल्वे स्टेशनला हिंदी भाषेमध्ये काय म्हणतात माहितीये?
विचारपूर्वक उत्तर द्या, कारण भल्याभल्यांना या प्रश्नाचं उत्तर जमलेलं नाही. काहींनी तर थेट गुगलचीच मदत घेतली आहे. पण, ही मदत घेण्याआधी थोडं डोकं चाळवा.
उत्तर नाही मिळालं? रेल्वे स्टेशनला हिंदीमध्ये 'लोह पथ गामिनी विराम बिंदू' किंवा 'लोह पथ गामिनी विश्राम स्थल', असं म्हटलं जातं. काही मंडळी रेल्वे स्टेशनला 'रेलगाडी पडाव स्थल', असंही संबोधतात. रेल्वेगाडीला हिंदीमध्ये 'लोह पथ गामिनी' असं म्हटलं जातं.