आग्रामधील ताजमहाल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे.
ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजसाठी बांधला होता.
मात्र, या सुंदर इमारतीचं नाव ताजमहाल नव्हतं हे फार कमी लोकांना माहीत आहे.
ताजमहालमध्ये मुमताज आणि शाहजहानच्या कबर बांधलेल्या आहेत. शाहजहानला त्याच्या तीन पत्नींसह इथे दफन करण्यात आलं.
ज्या वेळी बेगम मुमताज यांना इथे दफन करण्यात आलं, तेव्हा त्याचं नाव 'रौजा-ए-मुनव्वरा' असं ठेवण्यात आलं होतं.
मात्र नंतर त्याचं नाव बदलून ताजमहाल करण्यात आलं.