घराजवळ लावा 5 झाड, डास आसपास सुद्धा येणार नाहीत

Pooja Pawar
Sep 21,2024


सध्या डासांच्या दंशामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढत आहे.


अनेकदा आजूबाजूला किती स्वच्छता ठेवली तरी डास घरात भिरभिरताच. एवढंच नाही तर घरातील व्यक्तींना दंश सुद्धा करतात.


तेव्हा डास घराच्या आसपास सुद्धा येणार नाहीत याची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही 5 झाड घराजवळ किंवा गॅलरीत लावू शकता.

कडुलिंब :

कडुलिंबाची पाने ही कीटकनाशक बनवण्यासाठी वापरली जातात. कडुलिंबाच्या पानांना आयुर्वेदात खास महत्व सुद्धा आहे.

कडुलिंब :

घरात डास येण्यापासून रोखायचे असतील तर एका कुंडीत कडुलिंबाचा झाड लावून ते गॅलरीत किंवा घराजवळ ठेऊ शकता.

झेंडू :

झेंडू फुलाच्या झाडापासून डास दूर पळतात. तेव्हा घराजवळ झेंडूचे झाड लावल्यास डास आसपास सुद्धा येणार नाहीत


तुळस : तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या वासाने डास दूर पळतात.

लेमन ग्रास (सिट्रोनेला) :

लेमन ग्रासचं सिट्रोनेला रोप घराजवळ लावल्याने डास आणि बॅक्टेरिया दूर होतात.

एजरेटम :

एजरेटम या वनस्पतीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. याचा वास फार उग्र असतो ज्यामुळे डास आसपास सुद्धा भटकत नाहीत. हे झाड तुम्ही कुंडीत सुद्धा लावू शकता.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story