मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्नही जिओ गार्डनमध्ये पार पडले.
5 लाख स्क्वेअर फीटचा एरिया असलेल्या या गार्डनमध्ये तलाव, जलाशय आणि हिरवाईसह 7,2000 वाहनांच्या पार्किंगची सोय आहे.
हे पश्चिम मुंबईतील सर्वात मोठे ओपन-एअर टर्फे ठिकाण आहे.
जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल, दोन मॉल थिएटर, ड्राईव्ह-इन मूव्ही थिएटर, व्यावसायिक कार्यालय आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी अशा अनेक सुविधा आहेत.
जियो वर्ल्ड गार्डनमध्ये लॅक्मे फॅशन वीक, अरिजित सिंग कॉन्सर्ट, एड शीरन कॉन्सर्ट, जोनस ब्रदर्स कॉन्सर्ट, जिओ वंडरलँड यांसारखे अनेक कार्यक्रम झाले आहेत.
हे तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी भाड्याने बुक करायचे असेल तर यासाठी तुम्हाला रोज 15 लाख रुपये भाडं मोजावलं लागेल.
तिकीट काढून तुम्ही जिओ वर्ल्ड गार्डन देखील पाहू शकता. ज्या दिवशी कोणतेही कार्यक्रम नसतात त्या दिवशी सर्वसामान्यांना फक्त 10 रुपये नाममात्र शुल्क भरून पाहू शकता.