सून नावडती असेल तर काय करेल?

नातं समजून घ्या

सासू आणि सून हे नातं दोन पिढ्यांचं आहे हे समजून घ्या. यामध्ये अंतर असणारच याचा स्वीकार करा.

सून नावडती का?

सून तुम्हाला का आवडत नाही याचा विचार करा. अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला खटकतात हे समजून घ्या.

विचार बदला

सुनेबद्दल असलेले विचार पहिले बदला. एक स्त्री किंवा एक माणूस म्हणून पाहा आणि तिला स्पेस द्या.. नात हळूहळू सुधारेल.

समजून घ्या

नवीन व्यक्तीला नात्यात कायमच समजून घेणे गरजेचे आहे. तिच्यासाठी हा वेगळा अनुभव असेल. सुनेला वेळ द्या.

रुटीन लादू नका

सुनेवर तुमच्या घराचं रुटीन लादू नका. तिला तिचा मोकळा वेळ घ्या. विनाकारण त्रास न देता समजून घ्या.

सुनेची मतं महत्त्वाची

सुनेच्या मतांचा आदर करा. काही जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवा आणि त्या उत्तमपणे सांभाळल्या तर त्यावर कौतुक करायला विसरु नका.

निवडीचं स्वातंत्र्य द्या

हे कुटुंब तिचं देखील आहे त्यामुळे सुनेला निवडीचं स्वातंत्र्य द्या. तिच्या मतांचा आदर करा.

वाद टाळा

वाद टाळा सुनेशी संवाद साधा. रागावण्याऐवजी किंवा अबोला धरण्याऐवजी बोला शांतपणे संवाद साधा.

संबंध चांगले करा

सुनेसोबत नातेसंबंध चांगले करा हे तिच्या आणि तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

VIEW ALL

Read Next Story