हिवाळ्याच्या दिवसात तापमानात घट झाल्याने थंडी वाजणं साहजिक आहे.
परंतु काहीजणांना थंडीचा खूप जास्त त्रास होतो आणि त्यांना प्रमाणपेक्षा जास्त थंडी वाजते.
जर तुम्हाला इतरांपेक्षा खूप जास्त थंडी वाजत असेल तर याचं कारण तीन व्हिटॅमिनची कमतरता असू शकते.
शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर अशा व्यक्तींना थंडीचा खूप जास्त त्रास होतो.
शरीरात व्हिटॅमिन डी पर्याप्त प्रमाणात असेल तर हाडं मजबूत राहतात तसेच शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रणात राहते.
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते आणि शरीरात रक्ताची कमतरता जाणवल्यास जास्त थंडी वाजू लागते.
व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास जास्त थंडी वाजते. तेव्हा तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार आहारात बदल करून तुम्ही ही कमतरता दूर करू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)