भारतात वरणापासून, मसालेभात, भाज्या, शाकाराही आणि मांसाहारी पदार्थांमध्ये आल्याचा सर्रास वापर केला जातो
इतकंच काय, तर चहा बनवतानासुद्धा आलं वापरत चहाची चव वाढवली जाते.
मुळात आलं एक भाजी आहे की फळ? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आलं फळही नाही आणि भाजीसुद्धा नाही.
जाणून विश्वास बसणार नाही, पण आलं एक मसाल्याचा पदार्थ आहे.
जमिनीखाली उगवणाऱ्या या आल्याची गणतीच मुळात मसाल्याच्या पदार्थांमध्ये केली जाते. बिहारमध्ये आल्याला आदि, असंही म्हटलं जातं.
काय मग, आलं नेमकं आहे तरी काय हे जाणून अवाक् झालात ना?