बटाटे वडे आणि भजी हे सगळ्यांचेच आवडते पदार्थ आहे. मात्र घरी हे पदार्थ बनवत असताना विकतसारखे कुरकुरीत होत नाहीत.
भजी कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. भजी कमी तेलकट आणि कुरकुरीत होतील
कमी तेलकट भजी बनवण्यासाठी पीठात योग्य प्रमाणात साहित्य वापरावे.
भजीचे बॅटर जास्त पातळ आणि जाडसर नसावे. भजीला बॅटर कोट होत आहेत की नाही ते तपासा
तेलाच्या बॅटरमध्ये 3 ते 4 थेंब तेल मिसळा यामुळं भजी जास्त तेल शोषणार नाही
भजीच्या बॅटरमध्ये तांदळाचे पीठ किंवा कॉर्नस्टार्च मिसळा यामुळं भजी कुरकुरीत होतील
भजी तळताना तेल कमी किंवा जास्त तापलेले नसावे, जास्त तापलेले तेल असेल तर भजी करपतात किंवा तेल कमी तापलेले असेल तर जास्त तेल शोषून घेतात