हळद घातलेलं दूध हे आरोग्यासाठी लाभदायक असतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
हिवाळ्यात बरेचजण हळद घातलेलं दूध पिण्यास प्राधान्य देतात. मात्र काही लोकांनी हे दूध पिणं टाळायला हवं असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
पोट फुगणे, गॅस, अपचन इत्यादींची समस्या असलेल्या रुग्णांनी देखील हळदीचं दूध पिणं टाळायला हवं.
ज्या रुग्णांना फॅटी लिव्हरचा त्रास असेल अशांनी हळदीच्या दुधाचे सेवन करू नये.
गरोदर महिलांनी हळदीचं दूध प्यायल्याने त्यांच्या गर्भाशयाला त्रास होऊ शकतो. म्हणून हळदीच्या दुधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
हळदी शरीरातील आयरन शोषून घेण्याची क्षमता कमी करू शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)