शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात

Oct 04,2024


जास्त साखर खाणे हे हानिकारक अशा परिस्थितीत तुम्ही जास्त साखर खात आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी काही संकेताकडे लक्ष द्या.

वजन वाढणे

जर तुमचे वजन वाढत असेल तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत आहात. आपले शरीर चरबीच्या रूपात जास्त कॅलरी साठवते. त्यामुळे वजन वाढू शकते.

दात किडणे

जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने दात किडतात. कारण आपण जास्त साखर खातो तेव्हा आपल्या तोंडातील बॅक्टेरिया साखरेचे ऍसिडमध्ये रूपांतर करतात.

त्वचेच्या समस्या

जर तुम्हाला त्वचेच्या संबंधित समस्या होत असतील तर तुम्ही जास्त साखर खात आहात. साखर इन्सुलिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन वाढते आणि त्याची पातळी वाढल्याने मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

थकवा जाणवणे

जास्त साखर खाल्ल्याने थकवा जाणवतो. जेव्हा आपण जास्त साखर खातो तेव्हा आपली साखरेची पातळी वेगाने वाढते आणि कमी होते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

शरीरात सूज येणे

जर तुम्हाला तुमच्या शरीरात जास्त सूज येत असल्याचे जाणवत असेल तर तुम्ही जास्त साखर खात आहात हे लक्षात घ्या. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, जे हृदयासाठीही हानिकारक आहे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story