'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय
जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसू लागले असतील तर ते कसे कमी करायचे याबद्दल जाणून घ्या.
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काही घरगुती गोष्टींचा चांगला परिणाम दिसून येतो. यापैकी एखादा उपाय आठवडाभर करून पाहिल्यास डार्क सर्कल्स हलके होतात.
बटाट्याचा रस, ब्लीचिंग गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे हा रस डार्क सर्कल्स हलकी करण्यासाठी प्रभावी आहे. कच्चा बटाट्याचा रस कापसाने डोळ्यांखाली लावा आणि १५ मिनिटांनंतर धुवा.
टोमॅटोचा रस त्वचेवरील टॅनिंग आणि डाग कमी करण्यास मदत करतो. हा रस र्क सर्कल्स कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
कोरडेपणामुळे होणारी काळी डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी डोळ्यांखाली खोबरेल तेल लावा. हे तेल दिवसभरात अर्धा तास ठेवू शकता आणि नंतर ते धुवा.
दुधात हळद मिसळा आणि पेस्ट तयार करा. हळदीची ही पेस्ट त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि डार्क सर्कल्स कमी करते. ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)