तुम्हालाही हे आधीच घडल्यासारखं वाटतंय? Deja Vu म्हणजे नक्की काय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 21,2024


तुम्हालाही हे आधीच घडल्यासारखं वाटतंय? Deja Vu म्हणजे नक्की काय?


आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, आता जो क्षण जगतोय. तो या आधी अनुभवला आहे.


सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुम्ही एखाद्या जागेवर गेला असेल तर असं वाटतं की, तुम्ही इथे याअगोदर आले आहेत. किंवा जे काही घडतंय ते या अगोदरही घडलं आहे.


या अनुभवाला 'देजा वू' असं संबोधलं जातं. पण देजा वू म्हणजे काय? हे का होतं? यामागे एक विज्ञान आणि शास्त्रीय कारण देखील आहे.


'देजा वू' हा एक फ्रेंच शब्द आहे. 'पहिल्यांदा हे अनुभवलं आहे' असा याचा अर्थ आहे. यावेळी ही घटना आपल्यासोबत घडल्याचा भास होतो.


या शब्दाचा पहिला वापर 1876 साली फ्रांसीसी दार्शनिक एमिल बोइराकने आपल्या पत्रात केला होता. लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, जवळपास 80% लोकांना आपल्या जीवनात कमीत कमी एक वेळा तरी असा अनुभव येतो.


देजा वू हा एक प्रकारचा असा प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्हाला हा क्षण आपल्यासोबत अगदी तंतोतंत नाही पण घडून गेला असा भास होतो.


आपला मेंदू कॉम्प्युटरप्रमाणे काम करतो. यामध्ये अनेक क्षण आणि आठवणी असतात. त्या या ना त्या फरकाने डोकं वर करत असतात.


तर कधी मेंदूचा सिग्नल क्रॉस किंवा चुकीच्या पद्धतीने लागतो अशावेळी देजा वूचा अनुभव येतो.

VIEW ALL

Read Next Story