पार्टी म्हटलं की, त्यात 'एकच प्याला' आलाच.
हा प्यालाही विविध प्रकारचा असतो बरं. अनेकजण पार्टीमध्ये फसफसणारी शॅम्पेन उडवून आनंद साजरा करताना दिसतात.
शॅम्पेन या शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये? मुळात जे पेय तुम्हा शॅम्पेन म्हणून पिता ती स्पार्कलिंग वाईन असते.
शॅम्पेन हे फ्रान्समधील एका ठिकाणाचं नाव असून, तिथं उत्तम प्रकारची स्पार्कलिंग वाईन तयार केली जाते आणि इथं तयार होणारी स्पार्कलिंग वाईन शॅम्पेन म्हणून ओळखली जाते.
फ्रान्स वगळता आणखी कोणत्याही ठिकाणी ही वाईन तयार केल्यास ती शॅम्पेन ठरत नाही.
स्पार्कलिंग वाईन तयार करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असून, कैक वर्षांसाठी या पेयाची बाटली उलटी करून ठेवली जाते.