बीसीसीआयचे सचिव जय शाह हे 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसीच्या अध्यक्षपदी रुजू झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षांसाठी असणार आहे.
जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीय व्यक्तींनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलंय होतं. अध्यक्षपदी निवड झालेले जय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.
ऑगस्ट महिन्यात जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.
मात्र आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर जय शाह यांना बीसीसीआयच्या सचिव पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. तेव्हा BCCI चे नवे सचिव होण्यासाठी तीन नाव सध्या चर्चेत आहेत.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली हे बीसीसीआयचे पुढील सचिव होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. रोहन हे भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र आहेत.
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल हे देखील बीसीसीआयचे पुढील सचिव होऊ शकतात.
बीसीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला हे जय शाहनंतर बीसीसीआयचे पुढील सचिव होऊ शकतात. ते भारतीय क्रिकेटसाठी दीर्घकाळ काम करत आहे.
जय शाह यांचं वय 35 वर्ष आहे. जय शाह यांनी ICC च्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यावर आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे स्वागत केले आणि आता जागतिक क्रिकेटच्या नवा अध्यायाला सुरुवात होतं आहे असे म्हटले.