भरपूर जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. पण तुम्हाला माहित आहे का असे का होते ?
याबाबत झालेल्या संशोधनात असे आढळून आले की,जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते त्यावेळी गोड खावेसे वाटते.
काहीवेळेस रक्तातील साखरेची पातळी चढ उतार होत असते त्यावेळी शरीराला ऊर्जेची गरज भासते आणि गोड खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
हार्मोन्सच्या होणाऱ्या बदलांमुळे देखील गोड खावेसे वाटते.
असं म्हणतात की,जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने पोटातील बॅक्टेरिया असंतुलित होतात आणि गोड खाण्याची इच्छा वाढते.
गरोदरपणामध्ये देखील असे सतत गोड खावेसे वाटते. ज्यावेळी आपल्याला मानसिक ताण किंवा भावनिक ताण असतो त्यावेळी स्टेरोटोनीनती पातळी खालावते आणि गोड खाण्याची इच्छा होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)