रात्रीच्यावेळी नख कापू नयेत असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण यामागचं कारण खूप कमी लोकांना ठाऊक असतं.
ज्योतिषतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार सूर्यास्तनंतर नख कापणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात दारिद्रय येत आणि देवी लक्ष्मी नाराज होते असं म्हटलं जातं.
संध्याकाळी घरात लक्ष्मीचे आगमन होते असं म्हटलं जात अशावेळी नखं कापणं, केस कापणं, केस विंचरणे आणि घराची साफसफाई करणे अशी घाणीशी संबंधित कामं संध्याकाळी करणं अशुभ मानलं जातं.
शास्त्रांमध्ये असं देखील लिहिलं आहे की मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार दरम्यान नख कापू नये. रविवार आणि बुधवार हे दिवस नख कापण्यासाठी चांगले मानले जातात.
रात्रीच्या वेळी नख न कापण्याचं वैज्ञानिक कारण म्हणजे नख कापताना बोटांना इजा होऊ शकते.
पूर्वीच्या वेळी घरांमध्ये वीज नव्हती अशावेळीप्रकाश कमी असल्याने नख कापताना बोटांना इजा होण्याची शक्यता होती, त्यामुळे रात्री नख कापू नयेत असं म्हटलं जायचं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)