तुम्हाला माहित आहे का एखाद्या व्यक्तीचे चेहऱ्याचे स्वरूप त्याचे नाव दर्शवते.
एका नवीन संशोधनात असे आढळून आले की, लोक तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतात, पदवीपासून ऑफर लेटरपर्यंत प्रत्येक गोष्टीवर तुमचे नाव लिहिलेले असते.
एवढच नाही तर आपल्या नावाचा आपल्या व्यक्तिमत्वावर देखील खोल परिणाम होत असतो.
संशोधनानुसार, जसे आपण मोठे होतो तसतसे आपले स्वरुप नावानुसार बदलत जाते. .या अभ्यासानुसार चेहरा पाहून एखाद्या व्यक्तीच्या नावाचा अंदाज लावण्याची क्षमता माणसामध्ये असते.
संशोधनात जेव्हा लोकांना वयस्कर लोकांचे फोटो दाखवण्यात आले आणि त्याबरोबर चार नावांची निवड करायला दिली तेव्हा त्यांनी संधीपेक्षा योग्य नाव निवडली.
तसेच अभ्यासाचे निष्कर्ष असे दर्शवते की जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या नावानुसार आपले स्वरूप बदलू लागते. मग ते हेअर स्टाइल, मेकअप, चष्मा किंवा चेहऱ्यावरील हावभाव असो.
जन्माच्यावेळी दिलेली नावे सोशल टॅग असल्याचा संशोधनातून समजले. जसजशी वर्ष जातात लोक त्यांच्या नावाशी संबंधित वैशिष्ट्य आणि अपेक्षा समाविष्ट करू लागतात.